दहावी ब .
येथे लिहिलेल्या सर्व गोष्टी काल्पनिक असून त्यांचा प्रत्यक्ष जीवनाशी काहीही संबंध नाही. असे असल्यास तो केवळ योगायोग समजावा
शाळा भरली होती दहावी ब मधे नेहमीप्रमाणे उत्साहचे वातावरण होते. विशेषकरुन जोश्या जिथे बसला होता तिथे उत्साह उतु भरून चालला होता. जोश्या म्हणजे एक प्रकारचा विचित्र प्राणी होता. त्याची बरोबरी या पृथ्वीतलवरील कोणताही मनुष्य करू शकणार नाही. त्याच्या Human Body Parts वरील कंसेप्ट्स अतिशय क्लियर होत्या. त्या बाबतीत तो आम्हा सर्वांपेक्षा प्रौढ़ होता.
माझ्या मागच्या बाकावर नितीन कुलकर्णी बसायचा . एखाद्या महान शास्त्रज्ञां सारखा भाव त्याच्या चेहऱ्यावर असायचा . त्याने बेडकाच्या आकाराचे कागदी विमान तयार केले होते . तो सांगत होता , हे विमान तशी ४० किमी वेगाने दहा किलोमीटर जाऊ शकते . त्याची Aerodynamics मी फार विचार करून केली आहेत . मी बावळटासारखा त्याच्या तोंडाकडे बघत होतो . गोटया आणि टारो यांना हसू आवारात नव्हते .
पुढला तास कुठला आहे हे मला माहीत नव्हते . मी मागे बघितले. गोट्याच्या डोळ्यात चमक होती . आणि टारो आतुरतेने वाट बघत दरवाज्याकडे बघत होता . याचा अर्थ मी इंग्रजीचा शुक्ल मॅडमचा तास असावा असा लावला
तेवढयात शुक्ल मॅडम यांची entry झाली .काही मुलांना थंडगार वाटले जोश्या आपल्या जागेवर जाऊन बसला पुढच्या बाकावरील काही मुलांनी नमस्ते मॅडम केलं
Alice in Wonderland नावाचा धडा होता. काही मुलांना वेलीस ची आठवण झाली . मुलींच्या रांगेजवळ बसणाऱ्या मुलांचे लक्ष बाजूच्या मुली कुठले पान काढतायत याकडे होते. शुक्ल मॅडमनी धडा अतिशय छान शिकवला . तेवढ्या वेळात गोट्याचा डबा खाऊन झाला होता . मॅडमच्या ते लक्षात आले . गोट्याने लाडू तोंडात कोंबला होता .
मॅड्म : रुपेश ( गोटया ) सांग पाहू Alice Wonderland मध्ये कशी हरवते .
गोटया : टारोला खुणावत होता. पुस्तकात उत्तराच्या इथे बोट ठेव म्हणून. टारोला अजुन धडाच सापडला नव्हता .
मॅडम : वर्गात लक्ष कुठे असतं तुझं . काय करत होतास .
गोटया : काही नाही मॅडम .
पुढल्या बाकावरील काही मुलांना उत्तर द्यायची हुक्की आली होती . त्यांनी ती उत्तरे दिली . प्रश्न संपल्याचे समाधानं सगळ्यांना झाले .
तेवढ्यात मॅडमचे लक्ष त्यांच्या गळ्याकडे गेले , त्यानी डोळे वटारले व गळा दोन्ही हातांनी धरला होता . माझे आणि माझ्या मागील सगळी मुले डोळे वटारून एकटक मॅडमकडे पाहू लागली . काहींना तर ही संधीच वाटली .
माझं मंगळसूत्र हरवलं आहे . कुठे पडलंय ते बघा लवकर. पुढल्या बाकावरील वैजाला ४०/४० मार्क मिळवण्याची हीच संधी आहे असे वाटून शोधाशोध सुरू केली . बरीचशी मुले बाकाखाली बघु लागली . काही मुले अजून मॅडमकडेच बघत होती .
तेव्हड्यात मनीष पुढे आला .
मॅडम तुम्ही घाबरू नका . मी शोधून देतो . त्याने दोन पंटरांना डावीकडे आणि दोन पंटरांना उजवीकडे शोधायला पाठविले . वैज्या आणि दोघांनी जीवाचे रान केले . ते रांगत रंगत मुलांच्या ओळींमधून शोधून आली . जोश्याने त्यांना टपला मारायचा चान्स सोडला नाही .
काही मुले मुलींच्या बेंचच्या इथे पडली असणार म्हणून तिथे शोधायची इच्छा दाखवीत होते. मॅडम शोधात शोधात चक्रगीरी बसला होता तिथे आल्या. शेजारच्यांनी चक्रगिरी ला उठविण्याचा प्रयत्न केला . तो एकाएकी जागा झाला, आणि पुस्तक वाचू लागला .
अरविंद चक्रगिरी यांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणे शक्य नाही . ते एक महान व्यक्तिमत्व आहे . चक्या एक सोच आहे, असं मला कावळ्याच्या भावाने समजावून सांगितलं . त्यासाठी त्याने रात्रीचे बारा ते तीन प्रवचन केल ते अजून माझ्या लक्षात आहे. चक्रगिरी आणि आईन्स्टाईन यामध्ये फारसा फरक नसावा . फक्त चक्याचे मराठीतले लिखाण कानडी लिपीमध्ये होते . तो तसा कधी कर्नाटकी नव्हताच . आम्ही त्याला पूर्ण महाराष्ट्रीयन करून टाकला होता . पण लुंगी हातभार वर दुमडली तरच तो कर्नाटकी वाटायचा.
चक्रगिरी चे कुरळे केस आईन्स्टाईन सारखेच होते.
चाक्याला थोडयाच वेळात परिस्थितीचा अंदाज आला, मॅडमचे मंगळसूत्र हरवले आहे असे कोणीतरी त्याच्या कानात कुजबुजले . मिळेल की मग ते , असे म्हणून पुस्तक आवरुन पेटीमध्ये ठेवले
जोश्या : मी वर्गाच्या बाहेर शोधून येतो .
मॅडम : नको त्याची काही गरज नाहीये बस जागेवर .
तास संपला मॅडमचे मंगळसूत्र काही मिळाले नाही.

No comments:
Post a Comment