जेटी
मी आणि दोघे तिघे मित्र जेवायला नाहामीच एकत्र असायचो. पण ती केवळ एक योगायोगाची गोष्ट आहे असे मला वाटते.
चौकोनाची चार टोके एकत्र केल्या सारखे वाटायचे.
एकदा जेवत असताना जेटीला जाई जुई ची गोष्ट सांगायची इच्छा झाली. ती गोष्ट अशक्य, अतिश्रावानीय, अशी होती. अगदी खरं.
जेटी ती गोष्ट सांगताना अतिशय रमून गेला होता. पुढे पुढे तर तो गोष्ट सांगताना इतका गुंतून गेला होता कि त्याने जेवायचे सोडून दिले.
एकसारखा तोंडाचा पट्टा सुरु होता. १२० - १५० च्या स्पीडने जेटी जात होता. मध्ये मध्ये घाम पुसत होता, गोष्ट सांगत होता.
श्रीजीना गोष्टीचा मतितार्थ हवा होता, कारण नंतर विचारलेल्या प्रश्नांना त्यांना ताडकन उत्तर द्यायचे होते.
पगानला हि गोष्ट कधी संपते आणि माझी सुटका कधी होईल असे वाटत होते, असो ते नेहमीचेच. ..
मी ती गोष्ट पुन्हा कोणाला तरी सांगता यावी या हेतूने आठवणीत ठेवायचा वायफळ प्रयत्न करीत होतो.
दामले जाई जुईच्या सोसायटी मध्ये राहत असल्या सारखा एक दोन गोष्टी मधेच जोडत होता, आणि त्या गोष्टी मध्ये
रॉकेल टाकल्या सारख्या पेटवत होता. जेटी थांबायचे नाव घेत नव्हता. जेटी ने आज विश्वविक्रमही केला असता.
१८० च्या स्पीड वरही त्याची गाडी बेभाम धावत होती. त्याच्या तोंडाचा पट्टा F1 च्या गाडीला लावला तरीही चालण्यासारखे होते.
शेवटी पाऊन तासानंतर जाई जुइनाच बहुतेक कंटाळ आल्याने गोष्ट थांबवली.
प्रशोत्तरे झाली. श्रीजीना काही कळलेच नाही. मधेच गोष्ट का थांबवली म्हणून त्यांनी एकाच गोंधळ केला, चिडचिड केली.
प्रश्नांची उत्तरे हि त्यचा प्रश्नांची आहेत असे कोणालाच वाटले नाही. जेटीच्या डोळ्यात समाधान होते.
पोटातले फार मोठे गुपित उलगडून सांगितल्यासारखा त्याचा भाव होता.
पगन माझा जीव वाचला या आनंदात डबा घेऊन निघायच्या तयारीत होता.
आम्ही पण पाणी पिऊन निघालो.
Wednesday, November 25, 2009
Subscribe to:
Posts (Atom)